देवगिरी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा; सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारात प्रथम क्रमांक

Foto
सर्व संमक मंडळ
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनतर्फे २०२५-२६ या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारात येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लि. ने प्रथम क्रमांक पटकावला. रु. १००१ कोटींपेक्षा अधिक ते रु. २५०० कोटींपर्यंत ठेवी असलेल्या नागरी सहकारी बँकांच्या गटातून देवगिरी बँकेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सहकारी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासद नागरी सहकारी बँकांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनतर्फे दरवर्षी सर्वो त्कृष्ट बँक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा देवगिरी नागरी सहकारी बँकेने आपल्या गटात प्रथम क्रमांक मिळवत हा मानाचा पुरस्कार प्राप्त केला. या पुरस्काराचा वितरण सोहळा
शनिवारी (दि.१२) एक्सप्रेस इन हेरिटेज, सुंदरवाडी येथे पार पडला. यावेळी संचालक सजनराव मते (नाना), राजेश जैन, नागनाथ काजळे, सुरेश जगाडे, डॉ. प्रज्ञा तल्हार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले, सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारासाठी देवगिरी बँकेची निवड होणे आनंदाची बाब आहे. मात्र, हा सन्मान कोण्या एका व्यक्तीचा नसून बँकेशी जोडलेल्या प्रत्येकाचा आहे. बँकेला मिळालेला हा सन्मान म्हणजे संचालक मंडळाचे मार्गदर्शन, व्यवस्थापनाचे नियोजन, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम तसेच सभासद व ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाची पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions